रायगड येथे श्रावणसरी हा काव्यमय कार्यक्रम पार पडाला !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी- प्रा. अंगद कांबळे ]
गोखले एज्युकेशन सोसायटीचे काला वाणिज्य आणि विज्ञान महा विद्यालय श्रीवर्धन ( रायगड ) येथे शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट २२ रोजी श्रावणसरी हा काव्यमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्राचार्य श्री श्रीनिवास जोशी यांचे अध्यक्षतेखाली व प्रोफेसर संतोष लंकेश्वर, प्रोफेसर नवज्योत जावळेकर क. मा. वि. पर्यवेक्षक अन श्रीमती मृण्मयी भुराणे, मराठी विभाग प्राध्यापिका यांच्या अनमोल सहकार्याने काव्यवाचन, साहित्य प्रतिभेवर भाष्य, अशा उत्तम कार्यक्रमाचे आयोजन, संयोजन करण्यात आले होते.

कॉलेजच्या विद्याथी विद्यार्थीनी यांनी त्यांच्या कविता वाचनास उत्स्फुर्त सहभाग आवडीने घेतला होता. श्री सुनील चिटणीस कवी, लेखक यांनी त्यांच्या मनोगतातून श्रावण, श्रावणसरी यावर भाष्य करून त्यांच्या स्वरचित चार पाच कविता सादर करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली.
विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली. कवी नितीन सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दोन गझल सादर केल्या . सदर कार्यक्रम संस्मरणीय असा फारच छान साजरा झाला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या