राजेश मंदावार यांना आंबेगाव भूषण पुरस्कार जाहीर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         येथील भूमिपुत्र सध्या पंचायत समिती आंबेगाव जिल्हा पुणे येथे शिक्षण विभागात कार्यरत असलेले राजेश गंगाधर मंदावार हे गेल्या दहा-बारा वर्षापासून आंबेगाव तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण,दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन सोयी सोयी सुविधा मिळवून देणे, समाजमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवणे, शिक्षक, अंगणवाडी ताई, शालेय व्यवस्था समिती, यांना प्रशिक्षण देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देणे, असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
त्यामुळे त्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा “आंबेगाव भूषण 2023” या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
              हा पुरस्कार युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचलित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्र, दिव्यांग क्षेञ, उद्योग क्षेञ, वैद्यकीय क्षेत्र, विधीतज्ञ क्षेञ,पञकार क्षेञ,समाजरत्न व समाजभूषण आशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 44 व्यक्तींना हा पुरस्कार दिनांक 30 एप्रिल रोजी माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, अजयजी मोरे अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे,गौतम खरात यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. हा पुरस्कार राजेश मंदावार यांना मिळाल्याबद्दल त्यांचे नातेवाईक,मित्रमंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या