जनताच माझे दैवत असल्याने मी कोणत्याही विरोधकांना घाबरत नाही – आ.राजेश पवार

नायगाव मतदारसंघातील विराट जनसमुदायांच्या उपस्थितीत आ.पवारांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न !

 [ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव विधानसभा मतदारसंघात मी थेट मतदारांना भेटतो आणि गांव तेथील समस्य सोडविण्यासाठी सदैव कटीबध्द राहत असल्याने माझ्या पक्षातील लोकप्रतिनिधी सह अन्य विरोधकांची माझ्या विरोधात फार मोठी फळी तयार झाली आहे.मात्र तमाम मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत असल्यामुळे जनता माझ्या पाठीशी उभी असून माझ्या ऐतिहासिक विजय नंतर आज ही माझ्या वाढदिवसला विराट जनसमुदाय उपस्थित असल्याने मी कोणत्याही विरोधकांना थारा देत नाही आणि घाबरत नसून या मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी आणले त्यामुळे आता या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही असा आशावाद आ.राजेश पवारांनी सत्कारला उत्तर देताना प्रतिपादन केले.

   दरम्यान नायगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आ.राजेश पवारांचा वाढदिवस म्हणजे तमाम हितचिंतक व मतदारांची एका प्रकारची दिवाळी दसरा असल्याचे चित्र आज नायगाव येथील जयराज पॅलेस येथे हजारो वाहनांचा ताफा व विराट जनसमुदायांची उपस्थिती होती. तर अभिष्टचिंतन सोहळ्यास सुप्रसिद्ध हभप सागर महाराज बोरटे माळशिरस यांनी कीर्तन हे लक्षवेधी ठरले असून महंत यदुबन १०२ महाराज कोलंबीकर,डॉ शिवाचार्य विरुपक्ष महाराज मुखेडकर,महंत देवपुरी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जयघोषच्या घोषणा देत म्हणाले आ.राजेश पवार यांच्या वाढदिवसाला जनतेची लाट उसळल्याने निकाल सांगण्याची गरज नाही असे मत व्यक्त करून पुढील कार्यास सर्व हभप महाराजांनी शुभेच्छा दिल्या.
      पुढे बोलताना आ.राजेश पवार म्हणाले मी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी राजकारणात आलो.आणि २०१४ मध्ये प्रथम नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविताना बहाद्दर मतदारांनी मला ६० हजार मताधिक्य मिळाले.मात्र माझा निसटता पराभव झाला. तेव्हा पासून माझी झोप उडाली एवढ्या मोठ्या प्रमाणात मला मतदान करणाऱ्या नागरिकासाठी काही तरी केले पाहिजेत याहेतूने संबंध मतदारसंघ सातत्याने फिरून विकास कामाची माहिती घेताना या मतदारसंघाचा अक्षरशः विकास रखडला आहे हे लक्षात आले.त्यामुळे मनात आमदार होण्याची जिद्द बाळगून २०१९ मध्ये ५५ हजार मताने माझा ऐतिहासिक विजय झाला असून त्या विजयाची आज मला तुमच्या उपस्थिती पाहून त्या क्षणाची आठवण झाली.
     तसेच थोडं दुःख आहे कारण माझ्या मतदारसंघातील कै बापूसाहेब गोरठेकर,कै,गंगाधरराव देशमुख कुंटुरकर, कै डी.बी.पाटील होटाळकर,कै.भगवानराव भिलवंडे यांच्या निधनामुळे मी पोरका झालो अशी खंत आ राजेश पवारांनी व्यक्त करत समोर बसलेले मतदार हे माझ्या पाठीशी उभे असल्याने नायगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास आता थांबणार नसून २०१९ मध्ये आमदार होताच कोरोनाचे अभूतपूर्व संकट आले त्यानंतर सत्ता संघर्ष होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली.आणि तब्बल दोन वर्षे विकास रखडला. मात्र पुन्हा भाजपाची सत्ता येताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नायगाव मतदारसंघासाठी हजारो कोटीचा निधी उपलब्ध करून दिला.तसेच यापेक्षाही जास्त निधी राहिलेल्या कार्यकाळात खेचून आणणार असा आशावाद आ.राजेश पवारांनी विराट जनसमुदायांच्या उपस्थितीत म्हणाले.
       नायगाव येथील जयराज पॅलेस मधील विराट अभिष्टचिंतन सोहळ्याचे प्रास्ताविक रणरागिणी तथा लोकनेत्या पूनमताई पवारांनी विरोधकांचा समाचार घेत प्रहार केला. त्या म्हणाले मी नायगाव तालुक्यातील मांजरम जिल्हा परिषद सदस्य आहे.मात्र या मतदारसंघात फिरतांना एका वयोवृद्ध व्यक्तीने मला घरी बोलवून माझ्या कामाची दखल घेतली तसेच त्यांच्या तुडक्या पाकिटात माझी फ़ोटो दाखविली तेव्हा मला खुप आनंद वाटला की साहेब सारखे येथील जनता माझ्या कुंटुबावर प्रेम करते असे पूनम पवार म्हणल्या त्यानंतर श्रीहरी देशमुख यांचे भाषण लक्षवेधी झाली.तर आमदार राजेश पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात विजय पाटील डांगे यांनी सफरचंद हार घालून जोरदार स्वागत केले.
      याप्रसंगी पूनमताई पवार,रुपेश देशमुख, देविदास बोमनाळे, भास्कर भिलवंडे, माणिकराव लोहगावे,वसंत सुगावे,सुनील शिंदे,राहुल नखाते,शिवा पाटील गडगेकर,बाबासाहेब हबर्डे,गंगाधर कल्याण,सह नायगाव विधानसभा मतदारसंघातील असंख्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या