आमदार राजेश पवार यांच्या डबा पार्टीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांसोबत हितगुज साधण्यासाठी चालू केलेल्या टिफिन पार्टीचा उपक्रम बरबडा येथे आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नतून शेतकऱ्यांच्या सोबत डबा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने शेतकऱ्यांसोबत विविध विषयावर संवाद साधला असता शेतकऱ्याने डब्बा पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुक्यातील मौजे बरबडा येथील आमदार राजेश पवार व मांजरम जिल्हा परिषदेच्या माजी जि.प सदस्यां पूनमताई पवार यांच्या उपस्थितीत सदरच्या कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी एक शेतकऱ्यानी हितगुज साधला असताना शेतकरी म्हणाले की साहेब तुम्ही बरबड्याच्या विकासाठी मोठया प्रमाणात निधी दिला म्हणून बरबड्याचा विकास झाला.
तालुक्यातील बरबडा येथे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार राजेश पवार यांनी शेतकऱ्याशी थेट सवांद साधला असताना अनेक शेतकऱ्यांनी व परिसरातील सरपंच व उपसरपंच यांनी अनेक समस्याच्या बाबतीत अडचणी मांडल्या आहेत यात काही समस्याचे शंका समाधान आमदारानी केले कुंटूर येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत तात्काळ रुग्णाच्या सेवेत देण्यात यावेत बरबडा येथील आरोग्य विभागाची नूतन हे सुद्धा तात्काळ रुग्णाच्या सेवेसाठी देण्यात यावे अशी मागणी आमदाराकडे शेतकऱ्यानी केली.
बरबडा येथील बालाजीराव धर्माधिकारी यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या डबा पार्टीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेश पवार होते व्यासपीठावर सौ पूनमताई पवार, दिलीपराव धर्माधिकारी, बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी ,सरपंच माधवराव कोलगाणे ,व्यंकटराव सूर्यवाड, अशोक पाटील मुगावकर ,श्रीहरी देशमुख, गंगाधर बडूरे, सदाशिवराव पाटील पचलिंग, बालाजीराव धर्माधिकारी, सतीश सिंगेवाड, बालाजीराव जंगीलवाड, , देविदास बोमनाळे ,दत्ता पाटील गिरे, बाबू पाटील शेवाळे , प्रभाकर शेटे, मधुकर घोसलवाड, आदी यावेळी डब्बा पार्टीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या