आ. पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उसळला जनसागर

[ नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आ. राजेश पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला, तर याच सभेत आ. पवारांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना विजयी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी आ. राजेश पवार यांनी हजारो मतदारांच्या उपस्थितीत हेडगेवार चौकापासून तहसीलपर्यंत वाजत गाजत रॅली काआपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महीला व पुरुषांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर नांदेड हैद्राबाद रस्त्यावर असलेल्या देगाव शिवारातील माणिकप्रभू पेट्रोल पंपासमोर जाहीर सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रमुख म्हणून सचिन भाऊ साठे, राजेश कुंटूरकर, वसंत सुगावे, देविदास बोमनाळे, बाबुराव गजभारे, बालाजी मद्देवाड, विजय डांगे, ज्ञानेश्वर सावंत, पुनमताई पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी सभेला संबोधित करतांना खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, आ. राजेश पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सभेला गर्दी बघून आ. पवार यांचा आजच विजय झाला असे दिसत आहे. नायगाव मतदारसंघात आ. पवार यांनी विकास कामे करीत जनतेची सेवा केली म्हणूनच आज जनता त्यांच्या पाठीमागे दिसत आहे. मागील आडीच वर्षात महायुतीचे सरकार राज्यात चांगले काम केले, कल्याणकारी निर्णय घेतले. त्यामुळे पुन्हा राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे. तुम्ही कोणत्याही भुलथापांना बळी न पडता राजेश पवार यांना पुन्हा आमदार करा, असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या