आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नातून पर्यटन व जिल्हा नियोजन विभाग अंतर्गत कोलंबी मठ संस्थांना एक कोटी सहा लाख निधी मंजूर झाला. आमदार राजेशजी पवार यांच्या प्रयत्नातून पर्यटन व जिल्हा नियोजन समिती योजनेमधून (1कोटी सहा लक्ष रुपये) निधीतून कोलंबी येथील तीर्थक्षेत्राचे काम सभा मंडप यदुबन महाराज कोलंबीकर व आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या पूनमताई राजेशजी पवार, साहेबराव महाराज ,व्यंकटेश महाराज व इतर महाराजांच्या शुभहस्ते पूजन करून भूमिपूजन झाले यावेळी आदरणीय पुनमताई यांनी जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी चे उपअभियंता होनराव नाईकवाडे व महाराज यांच्या समवेत बांधकाम करण्याचा नकाशा समजून घेतला आणि उर्वरित किती निधी लागणार आहे. ते पण समजून घेतले व भूमिपूजन सोहळ्याच्या फलकाचे अनावरण करताना पंचक्रोशीतील ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळी भक्तगण, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ,कोलंबी, दरेगाव , कहाळा , सोमठाणा, मांडणी ,गोदमगाव ,नरंगल व परिसरातील सर्व मंडळीच्या सरपंच व गावकरी मंडळी ग्रामपंचायत कार्यालय कोलंबी तसेच यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे माधव कल्याण ,माधव चिंचले , रुईचे सरपंच निलेश रुईकर गोदमगावचे सरपंच पल्लेवाड, दरेगाव चे सरपंच प्रदीप पाटील, नरंगल चे सरपंच पांडुरंग पांचाळ, रावसाहेब माली पाटील, आनंदराव वडजे ,नरहरी पल्लेवाड देविदास धनंजे ,प्रकाश पाटील हेंडगे ,शहाजी पाटील कदम ,बाळू पाटील मांडणीकर, पळसगावचे सरपंच शिवाजी पाटील शिंदे, दादाराव पाटील शिंदे ,चिखले पाटील, राजू पाटील शिंदे ,पप्पू पाटील शिंदे, विजय बैस ,मनोहर बैस ,शिवाजी पाटील सोनवणकर, तंटामुक्त अध्यक्ष भिवाजी पाटील, प्रभाकर शिंदे जिल्हा परिषद उपा अभियंता होनराव साहेब ,पीडब्ल्यूडी इंजिनिअर नाईकवाडे साहेब, राठोड साहेब, सरपंच प्रतिनिधी शिवाजी लांडगे व प्रल्हादराव बैस व इतर मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी आदरणीय पूनम ताई पवार यांनी आपले विचार मांडताना भावनिक होऊन कोलंबी वरच प्रेम आणि दत्त मठ संस्थान बद्दल ची असलेली आस्था व श्रद्धा तसेच जुन्या आठवणी काढून उजाळा दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बैस केले प्रास्ताविक श्रीहरी देशमुख यांनी केले व समारोपीय भाषण व भावना या दोघां महाराज कोलंबी कर यांनी मांडल्या तर आभार प्रदर्शन पप्पू पाटील शिंदे यांनी केले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy