राजगृहातुन थेट भटक्यांच्या पालात…!!

[शब्दांकन – भास्कर भोजने ]
आमच्या देशात १९५० ला भारतीय संविधानानुसार प्रजासत्ताक राज्य पद्धती सुरू झाली, आता त्याला ७२ वर्षे पुर्ण होतं आहेत…!!
संयुक्त महाराष्ट्र १ मे १९६० ला अस्तित्वात आला त्यालाही ६२वर्षे पुर्ण होतं आहेत, शासनकर्ते तेच तेच निवडून येतात, घराणेशाही मजबूत झाली आहे साठ वर्षात १२ पंचवार्षिक योजनांचा कार्यकाळ संपला परंतु तरीही राज्यातील भटक्या विमुक्तांना रहायला घर, पिण्याचे पाणी,राशन कार्ड तथा, गावांत हक्काची जागा तसेच कुठल्याही मुलभूत सोई सुविधा अद्याप ऊपलब्ध झाल्या नाहीत हे वास्तव आहे…!!
महाराष्ट्रात या ४२जातीचे दिड कोटी भटके विमुक्त आहेत, प्रस्थापित राजकीय पक्ष या दिड कोटी भटक्या विमुक्तांचा केवळ मतदार म्हणून वापर करीत आले आहेत…!!
निवडणुका आल्या की, राजकीय पुढारी यांच्या पालावर जाऊन मते घेतात आश्वासन देतात, निवडून आले की, विसरून जातात मात्र गेल्या सत्तर वर्षात या भटक्या विमुक्तांच्या जीवनात कुठलाही बदल झाला नाही, आजही भटक्यांची भ्रमंती थांबली नाही…!!
इतिहास साक्षी आहे, भटक्यांच्या पालावर जाऊन जेवन करणारा एकमेव राजा कोल्हापूरचा छत्रपती शाहू होता…!!
छत्रपती शाहू राजे पारध्यांच्या पालावर जाऊन जेवन करीत ,त्यांचं सुखदुःख समजून घेतं त्यानंतर भटक्या विमुक्तांच्या पालावर कुणीही गेल्याची नोंद नाही, एका अर्थाने स्वातंत्र्यानंतर भटक्या विमुक्तांना कुणीही वाली मिळाला नाही, भटके विमुक्त अस्पृश्यच राहिले,त्यांना कुणीही जवळ केले नाही आणि म्हणूनच भटक्या विमुक्तांचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो अद्यापही झाला नाही…!!
नगर जिल्ह्यातील मढी येथे दरवर्षी उन्हाळ्यात भटक्या विमुक्तांची मोठी यात्रा भरते, तिथं सर्वच भटके विमुक्त आपापली जनावर घेऊन येतात, बि-हाड टाकतात, जात पंचायत भरवली जाते आणि आपल्या समस्या वर तोडगा शोधला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भटके विमुक्त येथे एकत्र जमतात. म्हणून मढीला भटक्यांची पंढरी म्हटले जाते…!!
भटक्यांच्या पंढरीला अर्थात मढीला वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे २०१८ पासुन जातं आहेत, भटक्या विमुक्तांच्या बि-हाडावर जाऊन त्यांची विचारपूस करीत त्यांना सत्तेचा वाटेकरी बनविण्यासाठी राजगृहातील आंबेडकर थेट भटक्यांच्या पालात जाऊन बसतो आहे…!!
२०१९ च्या निवडणुकीत भटक्या विमुक्तांना त्यांचा सत्तेतील वाटा द्यावा म्हणून वंचित बहुजन आघाडीने प्रा. विष्णू जाधव (कैकाडी) यांना बीड ची लोकसभेची उमेदवारी दिली, अनिल जाधव(वडार) पुणे तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातून सहदेव अप्पा अहिवळे (होलार) यांना उमेदवारी दिली…!!
विधानसभेत प्रा. किशन चव्हाण (पारधी) पाथर्डी, अॅड अरुण जाधव (कोल्हाटी)जामखेड. अशा भटक्या विमुक्तांना संधी देऊन सत्तेचा वाटा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार नाही मात्र सातत्य ठेवले तर भटके विमुक्त सत्तेत गेल्यावाचून राहणार नाहीत हेही समजून घेतले पाहिजे…!!
त्याचाच भाग म्हणून २९ मार्च मंगळवार २०२२ ला मढी येथे वंचित बहुजन आघाडीने भटक्या विमुक्तांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. सत्तेतील आपला वाटा कसा मिळवायचा त्याची सांगोपांग चर्चा आणि पुढील रणनीती ठरविण्यासाठी भटक्या विमुक्तांचे नेते वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण सर , प्रा. विष्णू जाधव (शिस्त पालन समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) अॅड अरुण जाधव. (भटके विमुक्त, समन्वयक. महाराष्ट्र राज्य.) नगरसेवक केशव मुद्देवाड डॉ. धर्मराज चव्हाण यांच्या सारखे नेते हिरीरीने कामाला लागले आहेत आणि २९ मार्चचे प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी झटतं आहेत…!!
तमाम भटक्या विमुक्तांनी लक्षात घ्यावे की, गेल्या ७२ वर्षात तुमच्या समस्या आणि तुमचे प्रश्न कुणीही समजून घेतले नाहीत, जसे छत्रपती शाहू राजे तुमच्या पालावर येऊन तुमच्या समस्या समजून घेत होते त्यानंतर केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू तुमच्या पालावर येऊन तुमच्या समस्या समजून घेतो आहे आणि तुम्हांला सत्तेच्या दालनात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे ही घटना अपूर्व आहे, तशीच ती ऐतिहासिक सुद्धा ठरणार आहे…!!
भटके विमुक्त समाज बांधवांनो आपला हक्काचा सत्तेतील वाटा मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने मढीला हजर रहा आणि परिवर्तनाचं चक्र गतीमान करा…!!
जयभीम.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या