न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न !..

(रायगड /म्हसळा ता.प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे)

श्री.स्वामी विवेकानंद यांचे विचार देशाचे भवितव्य  घडविण्यासाठी आवश्यक आहेत.स्वामी विवेकानंद यांचे वक्तृत्व आणि नेतृत्व जगाला परिचित आहें.असे प्रतिपादन प्राचार्य प्रभाकर मोरे यांनी केले.

स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित समारंभात प्राचार्य मोरे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदू समाज संघटनेचे अध्यक्ष सुभाष करडे हे होते.

या प्रसंगी स्कूल कमेटीचे चेेअरम समीरजी बनकर उपस्थित होते. प्राचार्य पुढे म्हणले की समाजात सुशक्षित आणि संस्कृत बनण्यासाठी श्री.विवेकानंद यांच्या आदर्श विचारांचा स्विकार करणे आवश्यक आहे.

स्कूल कमेटी चेअरमण समीरजी बनकर आपल्या मनोगतात म्हणाले की, समाजाच्या समृध्द उभारणी साठी स्वामी विवेकानंद यांच्या यक्तीमत्वाच्या कार्याची आपण सतत स्मरण ठेवले पाहिजे.

शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंके यांनी शिक्षण संस्थेला स्वामी विवेकानंदाचे नाव देऊन समाजात ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार रुजवण्यात यश मिळवले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री करडे म्हणाले आज च्या पिढीला आपल्या परंपराचा अभिमान असला पाहिजे. आपली संस्कृती वाचवण्यासाठी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी अशा समारंभाची नितांत गरज आहे.

तसेच श्री गांजरे सर यांनी आपले मनोगत मांडले, प्रास्तविक प्रा.महंमद शेख सर यांनी केले तर सूत्र संचालन श्री.सचिन गायकवाड सर यांनी केले व आभार आमले सर यांनी मांडले.

कार्यक्रमास विद्यालयांतील शिक्षक,प्राध्यापक,कर्मचारी, ग्रामस्थ,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते..

ताज्या बातम्या