कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने राजू लापशेटवार यांचा सत्कार !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी शहरातील पत्रकार बांधवांच्या बैठक आयोजित पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी कुंडलवाडी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू लापशेटवार यांचा सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.कुंडलवाडी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांचा पण कुंडलवाडी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वजीत कासले आपला परिचय देत गेल्या बारा वर्षाचा पोलीस दलातील कामाचा अनुभव सांगितले त्यानंतर कुंडलवाडी शहरातील विविध मुद्दावर पत्रकारांनी आप आपले मत मांडले शहरातील सर्व समस्या सोडण्यासाठी मी सदैव तयार आहे. असे आश्वासन सपोनि विश्वजीत कासले यांनी दिले .
यावेळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार एन.जी. वाघमोडे,कल्याण गायकवाड,गणेश कत्रुवार, सुभाष दरबस्तेवार,हर्ष कुंडलवाडीकर, मोहम्मद अफजल, माजीद नांदेडकर रुपेश साठे, सिध्दार्थ कांबळे, अमरनाथ कांबळे, अशोक हाके, नागोराव लोलापोड, संतोष चव्हाण, वसंत मदिकुंटावार, संतोष मेहरकर, नागनाथ कोलंबरे, शिवमणी नागुलवार, मुकेश जोशी व पोलीस कर्मचारी शेषेराव कदम,ईद्रीस बेग,नागेंद्र कांबळे आदींची उपस्थिती होती.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या