राजू पाटील समाज भुषण पुरस्काराने सन्मानित !
(विशेष प्रतिनिधी-चंद्रभीम हौजेकर)
बिलोली येथिल जेष्ठ पत्रकार तथा समाज सेवक राजु पाटील शिंपाळकर यांना नुकतच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दिला जाणारा सन २०२१ चा जाहीर समाज भुषण पुरस्कार नुकतच धर्माबाद येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर व समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतिने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा दरवर्षी समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. त्या अनुषंगाने यंदाचा सन २०२१ चा जाहीर पुरस्कार राजु पाटील शिंपाळकर यांना नुकतच धर्माबाद येथे दि.०४ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खांडापुरकर यांच्या व अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुर्वी ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र भुषण, बिहार हिंदी विद्यापीठ च्या वतीने शिरोमणी पुरस्कार, महात्मा कबीर समता परीषद नांदेड रत्न, डॉ.विठृलराव विख्खे पाटील कृषि पुरस्कार, ब्रिक्स मानव अधिकार मिशन च्या वतिने सरदार वल्लभभाई पटेल आशा जिल्हा व राज्य पातळीवरील विविध पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.या वेळी महीला प्रदेश अध्यक्षा अॅडो. राणीताई स्वामी प्रदेश कार्याध्यक्ष रामदास गिरे पाटील प्रदेश उपाध्यक्ष अमरजीतसिंह कालरा युवती प्रदेश अध्यक्षा पुजाताई निचळे महीला संघटक सुमनताई पोलशेटवार, व्यापारी संघटनेचे प्रदेश सेक्रेटरी राजू भारतीया मराठवाडा संघटक पंडित तिडके, संतोष ठाकरे, विजयालक्ष्मी काळे, नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरराव मावलगे महिला जिल्हाध्यक्ष आशाताई पांचाळ जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष छोटु पाटील बाभळीकर जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभाताई बोधने नायगाव तालुका अध्यक्ष सुरज बेळगे उमरी ता.अध्यक्ष हावगिराव पाटील बिलोली तालुका अध्यक्ष जेजेराव पाटील, बिलोली महिला तालुका अध्यक्षा सौ सुनंदा कोपुरवाड जयश्री पांचाळ, गंगासागर शिंदे , गणपतराव दुगमोड यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.