श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणाच्या 9 व्या वर्षानिमित्त नायगाव शहरातील राजुरा मारोती मंदीर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहि वर्षी महंत श्री संत यदुबन महाराज, 108 महंत संत श्री नारायणगिरी महाराज व प. पु. सद्गुरू नराश्याम महाराज यांच्या कृपा अशिर्वादाने व संबंध गावकऱ्यांच्या सेवा सहकार्याने करण्यात येतो.
——- सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम ——
श्रीरामनवमी ते श्री हनुमान जयंती या काळात चालणाऱ्या सप्ताहात पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १ गाथाभजन, दुपारी २ ते ५ श्रीराम कथा सायंकाळी ५:३० ते ६:३० हरिपाठ, रात्री ७ ते १० हरिकीर्तन व हरिजागर होणार आहे. दि. १२ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती निमित्त समस्त गावकरी मंडळीच्या वतीने दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर रविवारी १३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनपर किर्तनकार ह.भ.प छगन महाराज खडके यांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.
● नामवंत कीर्तनकारांची खास मेजवानी ●
पहिला दिवस श्रीराम नवमी विशेष किर्तन रविवार दि. ६ एप्रिल रोजी ह.भ.प. मुरलीधर महाराज भारती ( धाराशिव), दुसरा दिवस सोमवार दि. ७ एप्रिल रोजी ह.भ.प. विकास महाराज धसवाडीकर ( लातुर), तिसरा दिवस मंगळवार दि. ८ एप्रिल ह.भ.प. वासुदेव महाराज कोलंबीकर चौथा दिवस बुधवार दि. ९ एप्रिल रोजी ह.भ.प. त्र्यंबक अप्पा स्वामी नांदगावकर,पाचवा दिवस गुरूवार दि. १० एप्रिल रोजी ह.भ.प गणपत महाराज साळवेकर साहवा दिवस शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी ह.भ.प कान्होपात्रा ताई राजूरकर, सातवा दिवस श्री हनुमान जयंती विशेष शनिवार दि.१२ एप्रिल रोजी ह.भ.प भागवताचार्य मधुसूदन महाराज कापसीकर, सप्ताहतील शेवट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनपर किर्तनकार ह.भ.प छगन महाराज खडके यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
● दुपारी २ ते ५ संगीत श्रीराम कथेचे आयोजन ●
रोज दुपारी २ ते ५ या वेळेत रामायणाचार्य कृष्णा महाराज राजुरकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहचा लाभ घेण्याचे आव्हान मंदिर सप्ताह समिती व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy