गिरिष गोरठेकर इंग्लिश स्कुल व विद्याभारती ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यलय व पोलीस स्टेशनमध्ये साजरी केली राखीपोर्णिमा.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
आज दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी 75 वा अमृत महोत्सव निमित्ताने गिरीष देशमुख गोरठेकर इंग्लीश स्कूल व विद्याभारती ज्यू. कॉलेज उमरी येथे देशभक्तीपर गीत गायन सामूहिक गीत दहा वाजता घेण्यात आला.

तसेच रक्षाबंधन निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उमरी परिसरात आपल्या रक्षणासाठी नेहमी दक्ष राहणारे पोलीस कर्मचारी, उपनिरीक्षक चेवले साहेब व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील तहसीलदार मा. बोथिकर साहेब व कर्मचारी यांना राखी बांधून आणि शाळेत विद्यार्थ्यांनिनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना राखी बांधुन सामूहिक रक्षाबंधनाचा व सामाजिक एकोप्याचा कार्यक्रम साजरी करत आगळीवेगळी राखीपोर्णिमा साजरी केली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या