बिलोली पोलीस ठाण्यात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न !

[ विशेष प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली पोलीस ठाण्यात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधन्यात आली. भाजपा महिला मोर्चाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य हेमा चौधरी ,बिलोली शहराध्यक्ष अँड गीता बोमनाळीकर,शहर उपाध्यक्ष मिरा संगनोर यांनी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस बांधवाना व भाजपा कार्यकर्त्यांना राखी बांधुन पेढा भरवले.

या वेळी पोलीस उपनिरिक्षक केंद्रे, पोलीस उपनिरिक्षक बोधने ,भाजपा युवा मोर्चाचे बिलोली तालुकाध्यक्ष इंद्रजीत तुडमे, सय्यद रियाज, भाजपा शहराध्यक्ष राजु गादगे, हेमंत पटाईत, राहुल मामडे, साईनाथ शिरोळे, पिराजी शेळके, विनायक संगमवार सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या