प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबई मध्ये भव्य दिव्य रॅली संपन्न..!

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई मध्ये मोठ्या जल्लोषात कुर्ला येथून निघालेल्या रॅली चे नेतृत्व आद.प्रकाश आंबेडकर यांनी केले. रॅली मध्ये हजारो बाईक, रिक्षा सोबत घेऊन वंचितच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी रॅली यशस्वी केली. सदर कार्यक्रम वंचित बहुजन मुस्लिम आघाडी च्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आद.प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मोहम्मद पैगंबर बिलच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आद. प्रकाश आंबेडकर यांनी मोहम्मद पैगंबर बिल समजाऊन सांगत ते विधानसभेत आमदार. कपिल पाटील यांच्या माध्यमातून सभागृहात स्वीकारण्यात आले आहे. आता मुस्लिम समाजातील आमदारांनी पक्ष न बघता या बिलावर विधानसभेत बोल पाहिजे. मुस्लिम समाजाने देखील मुस्लिम आमदारांना ह्या बिल साठी जाब विचारायला पाहिजे असे साहेब बोलले. महाराष्ट्र अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी हिजाबच्या मुद्दयांवर मोदी सरकार हल्लाबोल केला.

यावेळी देश भरातून आलेलेल्या मुस्लिम धर्मगुरु यांनी आद. प्रकाश आंबेडकर साहेबांचे कौतुक करीत आभार मानले साहेबांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाच आयोजन मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान साहेब यांनी केले होते. तर यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष गोविंद दळवी, मुंबई अध्यक्षा सुनिता गायकवाड, मुंबई कमिटी, मुस्लिम आघाडी व मुंबई मधील सर्व तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी, महिला, युवक उपस्थित होते.
चांदिवली तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी साहेबांचे स्वागत प्रचंड जल्लोषात केल आणि विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या