प्रा.राम बादेवाड यांना पीएचडी फेलोशिप प्राप्त !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक विभागाकडून दरवर्षी पीएचडी संशोधन कार्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी )या प्रवर्गासाठी महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती )कडून फेलोशिप दिली जाते.
याच अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी विजय पटणे मेमोरियल स्कूल बिलोली येथे सहशिक्षक पदावर कार्यरत असलेले प्रा राम बादेवाड यांना पीएचडी संशोधनासाठी फेलोशिप प्राप्त झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल आंतरभारती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधररावजी पटणे, संस्थेचे सचिव चंद्रशेखर पाटील सावळीकर, संस्थेचे सहसचिव तथा मुख्याध्यापिका जयमाला पटणे, मुख्याध्यापक दिगंबर गंगुलवार, सहशिक्षक विनायक इंगळे, अमरनाथ कांबळे, विकास मिसाळे, गंगाधर दगडे, प्रल्हाद हातोडे, संध्या पाटील, सुवर्णा पांचाळ प्रियंका सोनकांबळे, सुधा दगडे, आदींनी त्यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या