श्रीरामलल्ला यांची जन्मभुमि आयोध्यामध्ये मुर्तीची प्राणप्रतिष्ठा दिना निमित्त बिलोली शहरात मोठा आनंद उत्सव साजरा.

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
गत अनेक शतकाच्या संघर्षानंतर हजारो ॠषिमुनी, महात्मा संतांच्या त्याग बलिदानंतर दि २२ जानेवारी रोजी हा शुभ दिवस आला. आपण श्रीरामलल्ला यांची जन्मभुमि आयोध्यामध्ये मुर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा अर्चना पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचे हस्ते झाली.

आयोध्योसह देशात आणि बिलोली शहरात मोठा आनंद उत्सव साजरा करतांना श्री राम यांच्या तैलचिञाची मिरवणूक काढण्यात आली. बिलोली शहरातील विविध भागात मंदिरात दिप व लाईट चे झगमगते दृश्य दिसुन येत होते. तर शहरातील श्रीराम मंदिर भक्तांनी नाचतगात गितांच्या गजरात बुंदीचा प्रसाद घरोघरी वाटप केला. व भगवत गीता ग्रंथ ही श्री राम भक्तांना दिले गेले

बिलोली शहरातील गंगा नगर येथील प्रभु श्रीराम मंदीर, जुना बसस्थानक ग्रामदैवत हनुमान मंदिर व दुर्गा माता मंदीर येथे सदिच्छा भेटी देऊन दर्शन घेतले व अयोध्या येथे होत असलेल्या प्रभु श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त रामभक्ताना शुभेच्छा दिल्या. यावेळी मधू जी गिरगावकर, माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, माजी नगराध्यक्ष विजयकूमार कुंचनवार , सामाजिक कार्यकर्ते शंकर मावलगे सेवा निवृत्त तलाठी माधवराव जाधव, शंकरराव मावलगे, दिलीप ऊत्तरवाड, नरसिंगराव मेघमाळे, नितिन ऊप्पलवार, गोपीनाथ शिंदे, धोंडीबा शिंदे, शंकर जिलकलवार, श्रीनिवास एंबडवार, बाबुराव गोसलोड, श्रीधर एंबडवार, लक्ष्मण शेट्टीवार, सचिन हरणे, किरण चौधरी यांच्या सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते रामभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या