कुंडलवाडीत राम मूर्तीची भव्य शोभा यात्रा !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
              येथील शहरात अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठाच्या अनुषंगाने शहरातून भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेत जय श्री राम चा घोषणेने संपूर्ण शहर दनाडले आहे.

            कुंडलवाडी येथे राष्ट्रीय स्वंसेवक संघ, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी आदींनी अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने शहरातून राम व हनुमान यांच्या प्रतीकात्मक मूर्तीची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.

सदरील यात्रा ही कुंडलेश्र्वर मंदिर, जोड मारोती मंदिर, दस्तगीर गल्ली, पोलीस ठाणे, मुंडे चौक, हेडगेवार चौक, संत गोरोबा चौक, मराठा गल्ली आदी मार्गाने राम मंदिर येथे यात्रेचा समारोप करण्यात आला.

या यात्रेत महिलांनी राम गीतावर पावले टाकत मोठ्या प्रमाणात या आनंदात सहभागी झाले होते तर तरुणांनी जय श्री राम घोषणेनी संपूर्ण शहर दनाडून सोडले. राम मंदिर येथे नागरिकांसाठी माजी उपाध्यक्ष डॉ विठ्ठल कुडमुलवार, माजी उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले. तर गावकऱ्यांकडून भांडारा करण्यात आला.
यावेळी गावातील नागरिक, महिला सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, राम जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आदी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या