हिंदू गर्जना रॅली व धर्मसभे साठी हिंदू बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा सहसंयोजक गजानन पांचाळ यांचे आव्हान !

(बिलोली ता.प्र – सुनील जेठे)
बिलोली येथे दिनांक ९ एप्रिल रोजी श्री राम नवमी (श्रीराम जन्मोत्सव) व हिंदू महागर्जना रॅली होणार आहे. यानिमित्त हिंदू परिषदेचे जिल्हा सहसंयोजक गजानन पांचाळ यांनी सर्व हिंदू बांधवांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

 श्रीराम जन्मोत्सव देशभरात साजरा केला जातो. तसाच बिलोली शहरातही साजरा होत आहे. नांदेड जिल्ह्यात 17 तालुका व बिलोली तालुक्यातील 83 गावे असलेल्या गावागावात बैठका घेऊन सदर श्रीराम जन्मोत्सव व हिंदू महागर्जना रॅली, धर्मसभेचे नियोजन गेल्या तीन महिन्यापासून मोठ्या उत्साहाने बिलोली शहरात साजरा करण्यासाठी सुरू होते.
रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता रॅली, सायंकाळी सात वाजता धर्मसभा, जनावरांचा बाजार बिलोली येथे आयोजित केली आहे. तरी या सभेत मुख्य वक्ते टी राजासिंह भैया यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे.
 तमाम हिंदू बांधवांनी ह्या हिंदू गर्जना रॅली धर्मसभेसाठी जास्तीत जास्त उपस्थित राहून ह्या सभेची शोभा वाढवण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन गजानन पांचाळ यांच्यावतीने करण्यात आलेल आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या