महापुरुष पोटी येण्यासाठी रमाईच्या त्यागाची महीलांना आवश्कता आहे. समतादुत दिलीप सोंडारे !

[ प्रतिनिधी – दीपक गजभारे घुंगराळेकर ]
 महीलांच्या पोटी महापुरुष जन्माला येण्यासाठी माता रमाईच्या त्यागाचे विचार महिलांन  आत्मसात करावे. असे प्रतिपादन नायगाव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी रमाईच्या जयंती दिनी, दि- 7 फेब्रुवारी रोजी नरसी येथे केले.

नरसी ता.नायगांव येथील बौद्ध विहार येथे माता रमाईच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काॅंग्रेस चे नायगांव तालुका युवा नेते, मा.भास्कर पाटील भीलवंडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा परिषद सदस्य मा.माणिकरा‌व लोहगावे, शिवसेना तालुका अध्यक्ष रविंद्र पाटील भिलवंडे, पोलीस पाटील ईब्राहीम बेग पटेल, तंटा मुक्तीचे अध्यक्ष वडजे व व्याख्याते समतादुत दिलीप सोंडारे उपस्थत होते.

सर्व प्रथम गौतम बुद्ध, महात्मा बस्वेश्वर, शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या वेळी बार्टी मार्फत राबविल्या जाणा-या विविध योजना व शिष्यवृती बाबद समतादुत यांनी सविस्तर माहिती देवुन रमाईच्या जीवन चरीञावर सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे व भास्कर पा.भिलवंडे यांनी आपले मनोगत मांडले. आभार गंगाधर भेदे यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या