१५०० रामभक्तांचा समूह आयोध्येला रवाना !

[ नांदेड विशेष प्रतिनिधी – गणेश कंदुरके ]
दि.14फेबूरवारी 2024 पहाटे ४ वा. श्रीरामाच्या जयघोषात १५०० रामभक्तांचा समूह आयोध्येला रवाना झाला आहे. या रामभक्तांचे दर्शन दि.१५ रोजी दुपारी होणार आहे.

आयध्यत २२ जानेवारी रोजी भव्य प्रमाणात शहरापासून खेड्यांपर्यंत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर आता दररोज हजारो रामभक्त आयोध्येला रवाना होत आहेत. संघ रचनेतून देवगिरी प्रांतातील सातही जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वय संघ, विश्व हिंदू परिषद, जागरण गट व अन्य संलग्न संस्थाचे रामभक्त कार्यकर्ते आस्था स्पेशल ट्रेनने आज निघाले आहेत, यात जवळपास १५०० कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. दिवसभर रामनामाचा जप व जयघोष करण्यात येत असून सायंकाळी हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र घेतल्या जाते. यात महिला, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळे रेल्वे मध्ये सुद्धा राममय वातावरण निर्माण झाले आहे. राम नामाच्या जयघोषाने रेल्वे दुमदुमून जात आहे. सर्वांना श्रीराम चरणांची ओढ लागली असून आयोध्येला कधी पोहचू असे झाले आहे.रेल्वे स्टेशन नांदेड येथे आयोध्या ला राम भक्तांना पाठवण्या साठी रेल्वेटेंशन नांदेड च्या वतीने भवे दिवे स्वरूपात स्वागतकरण्यात आले आहे.

श्री प्रभू राम जन्मभूमी आयोध्या येथुन आमंत्रित असणार्या राम भक्तांना नांदेड येथुन अयोध्येला नीगालेलया राम भक्तांचे स्वागत रेल्वे विभाग नांदेड च्या वतीने करण्यात आले आहे. या यावेळी जिल्हा संघचालक सुभाष शिंदे, जागरण गट जिल्हाप्रमुख पत्रकार शिवाजीराव कोनापुरे, विश्वानात आणा दाचावर, संग चालक बिलोली,सत्यवान गरुडकर, अयोध्या यात्रा प्रवास प्रमुख कृष्णाजी पोलावार,अशोक चवदरी मुखेड तालुका संग चालक,नायगाव तालुका कार्यवाह मनमत कस्तुरे,डाँ. सुदाकर रेडी,गादेवार सावकार,नायगाव तालुका गट प्रमुख पत्रकार गणेश पा. कंदुरके अनिरुद्ध देशमुख, बिलोली तालुका कार्यवाह माधव ठक्करवाड, शिवप्रसाद तोटावाड उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या