के. रामलू शाळेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील के रामलू पब्लिक स्कुलच्या वतीने पवित्र आशा रमजान महिन्याच्या अनुषंगाने सर्वधर्म समभाव जोपासत दिनांक 21 रोजी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. 
होते,यामध्ये कुंडलवाडी शहर युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सिराज पट्टेदार, साजिद सर, सलिम सर, पठाण सर, माचनूरचे सरपंच अब्दुल शेख, पालक प्रतिनिधी फेरोज शेख तसेच शाळेतील विद्यार्थी व अनेक मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन रोजा सोडला.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष सायरेडडी ठक्कुरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका रमा ठक्कुरवार, मुख्याध्यापक मठवाले, पर्यवेक्षक कागळे व शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी गावातील मुस्लिम बांधवांना, पालकांना व विदयार्थ्यांना पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या