रमजान निमित्त अखंडीत मुलभूत सुविधा प्रदान करा ; न.प.प्रशासनास मोहम्मद अफजल यांची निवेदनाद्वारे मागणी.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
दि.11 मार्च 2024 पासुन ईस्लाम धर्मातील पवित्र मास रमजान आरंभ होत आहे. तरी शहराती सर्व मस्जिद परिसर व मुस्लिम बहुल भागात अखंडीत मुलभूत सोई सुविधा प्रदान करण्यात यावे.यासबंधी भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस मोहम्मद अफजल यांच्यावतीने नगरपरिषद मुख्याधिकारी रघुनाथसिंह चौहान यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले की, ईस्लाम धर्मातील पवित्र मास रमजान दि.11 मार्च 2024 पासुन आरंभ होत आहे संपूर्ण महिना मुस्लिम समाज बांधव रोजा (उपवास) धरतात तसेच पाचवेळा नमाज, रात्री तरावी नमाज पठण करतात. या निमित्त पवित्रता नादते यासाठी शहरातील चार ही मस्जिद परिसरात तसेच मुस्लिम बहुल प्रभागात नगर परिषद प्रशासनातर्फे गटारी स्वच्छ करण्यात यावे.
गल्ली बोळीत साफसफाई करण्यात यावे. अखंडीत पाणी पुरवठा करण्यात आावे, ज्याप्रभागात विंधन विहीर नादुरुस्त आहे त्यांची दुरुस्ती करण्यात यावे, रस्त्यावरील खांबावरील बंद मक्यूरी-या चालू करण्याल यावे. तसेच शहरातील वाढते डुकरांचे प्रमाण लक्षात घेता त्यांची विल्हेवाट लावण्यात यावे, जे करन मुस्लिम समाज बांधवाची पवित्रता रमजान महिन्यात आबाधित राहील.अशा आशेचे निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनावर मोहम्मद अफजल यांची स्वाक्षरी आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या