प्रसिद्ध कीर्तनकार रामराव महाराज ढोक यांचा मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्यावतीने सन्मान !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
राज्याचे माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यावतीने प्रसिद्ध कीर्तनकार रामराव ढोक यांचा मरळक खुर्द तालुका जिल्हा नांदेड येथे सन्मान करण्यात आला.
राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांनी मरळक(खू.व बु.) ता.जि.नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलीला पारायण,रामकथा सोहळ्यानिमित्त ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांचे शाल पुष्पहार घालून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवकथा ऐकली.
यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ पावडे,गंगाधर कदम -कार्याध्यक्ष नांदेड,श्याम पाटील -तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस,नवनाथ कदम,गणेश कदम,हरिभाऊ पावडे, चीमेगावकर मामा,केशव पाटील शिंदे,किशन पाटील कदम,गंगाधर पाटील कदम,बळीराम पाटील कदम,तातेराव पाटील शिंदे यांच्यासह मरळक येथील समस्त गावकरी व भक्त गण उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या