धर्माबाद येथे कवळे गुरुजी यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
धर्माबाद येथे शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्माबाद लोकप्रिय नगरसेवक शंकर अण्णा बोनलवाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक माधुरी गंगाधरोड,द्वितीय पारितोषिक अस्मिता पांडे आणि तिसरे पारितोषिक प्रिय बालादी यांनी यांनी पटकावला तर प्रोत्साहन पर बक्षिसे ही प्रतेक सहभागी स्पर्धकाला देण्यात आली.अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद धर्माबाद येथील महिलांनी सहभाग नोंदवला.

यावेळी युवा नेते तथा नगरसेवक प्रतिनिधी शंकर अण्णा बोनलवाड,काशिनाथ उशल,बालाजी वारले पाटील,श्रीनिवास पाटील ढगे,पांडुरंग पाटील पांगरिकर,महेंद्र पाटील शिंदे,किरण चिंतलवाड,अजय जकापुरे,सतीश पाटील शिंदे,विजय वारले,युवा नेते गजानन कुरुंदे आदी जन उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या