राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या नायगाव विधानसभा अध्यक्ष पदी पंडित पाटील जाधव

(धर्माबाद प्रतिनिधी – नारायण सोनटक्के)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नायगाव विधानसभा अध्यक्ष पदी पंडित पाटील जाधव यांची निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीप दादा धोंडगे यांनी नियुक्ती पत्रकाद्वारे केली आहे.

सदरील निवडीमुळे नायगाव विधानसभा मतदारसंघातील युवकांत अनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील लोकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार पोहचवण्यासाठी व पक्ष बळकट करण्यासाठी सदरील नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांच्या सुचनेवरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा श्री दिलीप दादा धोंडगे यांनी एका नियुक्तीपत्रकाद्वारे केले आहे.

सदरील निवडिचे माजी मंत्री कमलकिशोर कदम साहेब, जिल्हा अध्यक्ष मा श्री हरिहरराव भोसीकर साहेब, माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे, माजी आमदार प्रदीप नाईक, शहर जिल्हा अध्यक्ष डॉ सुनिल कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा श्री वंसत पाटील सुगावे, बाळासाहेब भोसीकर, महिला जिल्हा अध्यक्ष प्रणंजली रावणगावकर, श्रीकांत मांजरमकर, भास्कर भिलवंडे, पांडुरंग देशमुख गोरठेकर, संतोष दगडगावकर, धर्माबाद न पा. गटनेता भोजराम गोणारकर, नगरसेवक प्रतिनिधी सुधाकर जाधव, अबेद अली, हांनमंत पा जगदंबे पिंपळगावकर, महीला ता अध्यक्ष सौ किरोळे, शहर अध्यक्ष सुलताना बेगम, माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी, म. मतिन म. युनुस, डॉ सुधीर येलमे, नागेद्र कदम, मोसीम खान, जावेद सर, यांच्या सह अनेक अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. नायगाव विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार आहे.

पक्ष बळकट करण्यासाठी व विधानसभा मतदारसंघात युवकांची मोठी फळी निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पंडित पाटील जाधव यांनी बोलताना सांगितले आहे.

ताज्या बातम्या