राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष पदी गंगाधर मरकंटे यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गंगाधर मरकंटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुंडलवाडी शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर यांनी दिले आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस गौसोद्दीन खुरेशी,तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष सादिक पटेल,कुंडलवाडी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार,शहर उपाध्यक्ष शेख इस्माईल मनूमिया आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,तालुका कार्यध्यक्ष नागनाथ खेळगे,युवक शहरध्यक्ष अमरनाथ कांबळे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष महमंद मुनीर,विधानसभा सरचिटणीस हणमंत पाटील खुळगे,शेख मुसताक आदीसह मित्र मंडळींनी शुभेच्या दिल्या आहेत..
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या