स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा गहू, तांदूळ मिळत असल्याची चौकशी करा — सिध्दार्थ कांबळे

• शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा !!

( कुंडलवाडी -अमरनाथ कांबळे )
 
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरांमध्ये असलेल्या कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या रास्त भाव दुकानात अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा, तांदळाचा माल बिलोली पुरवठा विभागातर्फे पुरवठा करण्यात येत आहे.

त्यामुळे शहरातील गोर गरिब लाभार्थ्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बिलोली उपजिल्हाधिकारी व तहसील कार्यालय यांनी तात्काळ चौकशी करावी. अन्यथा २६ जानेवारी २०२३ रोजी कुंडलवाडी शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बिलोली तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांना व तहसीलदार बिलोली यांना दिला आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या