चोरट्यांच्या चाकु हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या रवि कहाळेकर यांची मुर्त्यू शी झुंज ठरली अपयशी !

  • अखेर रवि कहाळेकर यांची प्राणज्योत मालवली.
  •  रवि कहाळेकर यांच्या मारेकऱ्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची लिंगायत समाज बांधवांची व वंचित बहुजन आघाडीची मागणी.
  • आक्रोश मोर्चा काढण्याचा ही दिला इशारा.
[ विशेष प्रतिनिधी – रियाज पठान ]
चोरट्यांच्या चाकु हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लोहा येथील युवक ‌रवि कहाळेकर यांची मृत्यूशी झुंज ठरले असून रुग्णालयात उपचार चालू असतानाच रवी कहाळेकर यांची प्राणज्योत मालवली असल्याचे लोहयात समजतात सगळीकडे हळहळ व्यक्त होत असुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी लिंगायत समाज बांधवांच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोहा पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले की, दि. १० नोव्हेंबर २०२१ रोजी मध्यरात्री रात्री १.३० वाजता रवि कहाळेकर हा बस स्टेशन समोरून जात असताना अज्ञात तीन लोकांनी पोटात चाकू मारून गंभीर अशी मारहाण करण्यात आली होती. मागीस वीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचारा दरम्यान त्यांचा काल सकाळी मृत्यू झाला. मागील २० दिवसांपासून आरोपींना अद्याप पर्यंत अटक झाली नाही. 
लोहा शहरात चोऱ्या व दरोड्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
सामान्य माणूस दहशतीत वावरत आहे. या प्रकरणातील आरोपीना चार दिवसांत अटक करून त्यांच्यावर कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी वेगवेगळ्या दोन निवेदनाद्वारे लिंगायत समाज बांधवांच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली असून जर आरोपींना अटक झाली नाही तर लोहा पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
 या निवेदनावर वंचीत बहुजन आघाडीचे लोहा तालुकाध्यक्ष सतीश आणेराव, शहराध्यक्ष सदानंद धुतमल, तसेच लिंगायत समाज बांधवांच्या वतीने दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ शेटे, स्वप्नील शेटे, पांडूरंग शेटे, पिंटू अप्पा वडडे, हरीभाऊ शेटे, राजू शेटे, विशाल वाडेवाले, विलास कहाळेकर, संदीप कहाळेकर, शिवलिंग वडे, माधव वसमतकर, पिंटू चौकले, अतुल कहाळेकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करा.

ताज्या बातम्या