नायगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांना अभिवादन !

(नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी)
नायगाव शहरातील संत रविदास नगर मध्ये विज्ञानवादी, महान क्रांतिकारक, संत गुरु रविदास महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विनम्र अभिवादन करण्यात आले.
शहरातील रविदास नगर मध्ये समाज व मित्र मंडळाच्या वतीने गुरु रविदास महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आणि सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले असून यावेळी गुरु रविदास महाराज यांच्या महान कार्यावर व समाज स्यिथी यांच्यावरही सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी अभिवाद करण्यात आलेल्या वेळी आयोजक कांबळे राजेंद्र राष्ट्रीय चर्मकार महासंघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष,यासह नारायण पाटील तमलुरे, कैलास पाटील शिंदे, शेख खलील साब, शिवाजीराव कांबळे, संजय कांबळकर, राजू वाघमारे, संदीप बालकोंडे, मोहन गंधारे, संभाजीराव हवेलीकर, अनिल हवेलीकर, राजू सोनटक्के, संदीप पवार, शिवानंद पांचाळ , साईनाथ गंधारे, शेख फरान, शेख आयान व विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या