मानवी जीवनाचे सर्व व्यवहार गणितावर आधारित असतात- प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
जिल्हा परिषद कन्या हायस्कूल नायगाव येथे गणित प्रदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना काढले. मानवाच्या जीवनातून गणित वजा केले तर सर्व व्यवहार धोक्यात येतील समाज विस्कळीत होईल मानवाच्या प्रत्येक कृती मागे गणित आहे, मोजमाप आहे म्हणूनच सर्व व्यवहार सुरळीत चालतात असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे माजी शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी याप्रसंगी केले.

गटशिक्षणाधिकारी एमजे कदम, साहित्यिक ज्ञानेश्वर शिंदे , केंद्रप्रमुख श्री साधू सर यांच्या शुभहस्ते महान गणित तज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. 
यानंतर मुख्याध्यापक आनंद रेणगुंटवार सरांनी प्रस्तावना सादर करताना गणित प्रदर्शन आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला. गणित विषयाच्या अभ्यासाची वाट अवघड असली तरी ती पार करणे अनिवार्य आहे, जीवनात काहीतरी वेगळं करायचं असेल तर गणिताची अवघड घाट चढावीच लागते आणि ती चढताना विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटू नये त्यात आवड आणि आनंद वाटावा, शैक्षणिक साधने वापरताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया घडावी व अध्यापनाचा हेतू सफल व्हावा यासाठीच आजचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
डायटचे प्राध्यापक शिवाजी साखरे यांनी आपल्या मनोगतात गणिताचे महत्त्व विशद केले. माणसाच्या आयुष्यात मित्र आणि गणितात सूत्र महत्वाचे असतात परंतु जीवनात येणारे मित्र मूर्त तर गणितातील सूत्र आणि संकल्पना अमूर्त स्वरूपात असतात .केंद्रप्रमुख साधू सरांनी गणिताची गोष्ट सांगत विद्यार्थिनीचे मनोरंजन केले. यावेळी सुनिता देशमुख यांनी गणित तज्ञ रामानुजन यांचे गणितातील योगदानाबदल प्रकाश टाकला व तसेच टॅक्सीकॅब नंबर व रामानुजन पॅराडॉक्स सूत्राद्वारे सिद्ध करून दाखवले. यानंतर “मॅथ्स में डब्बा गुल” हे गणित विषयावर आधारित असलेले गीत साक्षी मेटकर व तिच्या संचांनी सादर केले. 
प्रदर्शन मध्ये सहभागी विद्यार्थिनींनी गणिताच्या संकल्पना स्पष्ट करणाऱ्या विविध रंगाच्या सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तर काही मुलींनी गणितीय संबोध स्पष्ट करणारे गणिती साहित्य मांडले होते. तसेच सदरील प्रदर्शनात रेणगुंटवार सरांनी स्वतः बनविलेले शैक्षणिक साहित्य देखील मांडले होते. 
जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा, जि प हायस्कूल कुंटूर व स्थानिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. पालक व विद्यार्थ्यांनी साहित्य निर्मिती करणाऱ्या मुलीशी संवाद साधला व शंकाचे निरसन केले. ब्युटी पार्लर विभागाच्या सविता ढाक रे मॅडमनी गंगासागर बिरादार, योगिता देशमुख रूपाली राणे व केरले मॅडम यांच्या सहकार्याने शाळेच्या प्रवेशद्वारावर विविध रंगाच्या फुलांचा वापर करून काढलेली गणितीय सूत्रात बसणारी सुंदर रांगोळी सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती.
या कार्यक्रमाला विठ्ठलराव बेळगे, माधवराव शिंदे, भास्कर चव्हाण, श्रीनिवास शिंदे, उद्धव ढगे, बालाजी कल्याण, पदमावार, कोतुरवार, पचलिंग फावडे सर आवर्जून उपस्थित होते. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गाजलवाड सर, राजश्री फुके मॅडम, नितीन पाटील सर, हनुमंतराव मुक्कामवार सर, बाळासाहेब स्वामी सर सुनिता राठोड मॅडम, स्वाती देशमुख मॅडम व पंढरी वडपत्रे यांनी मोलाचे सहकार्य केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कोल्हे सर यांनी केले तर लता सावंत मॅडम यांनी वंदे मातरम गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या