प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचा विविध बँकांवर धडक मोर्चा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव विधानसभा युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांशी संबंधित नायगाव,उमरी,धर्माबाद तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या विविध अडचणीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे अनुदान व पिक विम्याची रक्कम बँक खात्यामध्ये जमा झालेली असताना राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने बँक खात्यास होल्ड मारून विविध अनुदान रोखण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने युवा नेतृत्व रवींद्र वसंतराव पा.चव्हाण यांच्या नेतृत्वात नायगाव उमरी धर्माबाद येथे युवक काँग्रेसच्या सहकार्याने युवक शेतकऱ्यांच्या समवेत निवेदन देण्यात आले आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या हेखेखोर पद्धतीच्या बोलण्याचा निषेध करण्यात आला.

 या मागणी निवेदनामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेल्या विविध अनुदान स्वरूपी रकमेला होल्ड न करणे, केलेला होल्ड तात्काळ काढणे,पिक कर्ज पुनर्गठन लवकरात लवकर करणे ,खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप आजपर्यंत झाले नाही ते लवकर करून देणे ,शेतकऱ्यांना बँकेत आल्यानंतर चांगल्या दर्जाची वागणूक देणे विविध अनुदानापोटी जमा झालेली रक्कम कर्जामध्ये वर्ग करून न घेणे, कसल्याच पद्धतीची शेतकऱ्याची अडवणूक न करता त्यांना अनुदान देण्यात यावे अशा विविध प्रलंबित प्रश्न लवकरच लवकर निकाली काढाव्यात अशा मागण्या आज करण्यात आल्या.
अश्या अनेक अडचणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून ठोसपणे सोडवण्याच्या माध्यमातून बँकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. अनेक त्रासामुळे शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे हे बॅंकेच्या व शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक ,लोकप्रतिनिधी व युवक शेतकरी वर्ग आणि ज्येष्ठ शेतकरी बांधव उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या