उपसरपंच रविंद्र दाजी कुवारे यांचे अल्पशा आजाराने निधन !

[ रायगड/म्हसळा – प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे ]
९ डिसेंबर २०२१ रोजी वार गुरूवार सकाळी ६ वाजता यांची रहात्या घरी भापट येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
भापट गावातील एक प्रभावी व्याक्तीमहत्व नेहमी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे रवी भाऊ कुवारे यांच्या अचानक निधनाची बातमी म्हसळा तालुक्यात समजताच ठाकरोळी विभागासह दुःखाचे सावट पसरले आहे.
भापट पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, आध्यात्मिक, राजकीय सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य दिसून येत होतं. त्यांच्या निधनाने खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षांत भापट गावासाठी भरीव असं योगदान दिले आहे. सध्या कोळवट गृप ग्रामपंचायत चे उपसरपंच पदावर कार्यरत होते.
या वेळी जिल्हा परिषद कृषी संवर्धन सभापती बबन मनवे, पंचायत समिती सभापती छायाताई म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, सदस्य सावंत मॅडम, मधुकर गायकर, तालुका अध्यक्ष समिर बनकर , सरपंच राजाराम तिलटकर, अनिल बसवत, सतीश शिगवण,रमेश कानसे, सुनील शेडगे, ग्रामसेवक अहिरे , इतर म्हसळा तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलं, मुली, व नातेवाईक परिवार आहे.
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून