श्री क्षेत्र येवती (लघु आळंदी) येथील श्री सद्गुरू प पु नराशाम महाराज मठ संस्थानच्या वतीने दि. ८ ते १४ जानेवारी २०२३ (रविवार ते शनिवार) या कालावधीत वार्षिक संजीवन समाधिकाल मोहत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात नित्य रोज समाधी, रुद्र अभिषेक, नामजप, अनुष्ठान, गुरु चरित्र पारायण, नराशाम स्तोत्र, गुरु महिमा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भक्ती संगीत, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आदीचा समावेश आहे. सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, नाराशाम स्तोत्र, गुरु महिमा, १० ते १२ गाथा भजन, दुपारी २ ते ५ भक्ती संगीत व प्रवचन, सायं. ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन, रात्री १२ ते ४ हरीजागर अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे.
दि. १३ जानेवारी २०२३ रोजी राहेर, हिप्परगा, खतगाव, चिखली, हाळदा, वसुर, हसनाळ, डोंगरगाव, कुंचेली, बावलगाव येथून येवती येथे पाई दिंडीचे आगमन होणार आहे.
दि. १४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते १२ ज्ञानेश्वरी सांगता, गाथा पूजा सांयं. ४ ते ६ सुगम संगिताचा कार्यक्रम, दुपारी २ वाजता संजीवन समाधी महाअभिषेक, महाआरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत गुरूमंत्र (गुरू उपदेशाचा) कार्यक्रम होणार आहे व दुपारी जंगी कुस्त्याचे सामने होणार आहेत.
श्री क्षेत्र जगन्नाथपुरी यात्रा मोहत्सव दि ८ ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छुक भाविकांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी असे आवाहन नाराशाम महाराज यांनी केले आहे. या सर्व कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थांनचे मठाधीपती सद्गुरु नराशाम महाराज यांनी केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy