विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना नांदेड येथे जाताना आर्थिकचा मोठा धक्का बसत आहे म्हणून गोरगरीब रुग्णाची सेवा आपल्याकडून चांगली व्हावी,रुग्ण कमी येतील जातील हे तुमच्या कामगिरीवर अवलंबून आहे, पण मिरकुटे परिवारांचे आणि आमच्या घराण्याची पूर्वीपासूनच ऋणानुबंध सबंध आहेत असे प्रतिपादन माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी डॉक्टर राजेश मिरकुटे यांना आपल्या मनोगतातून केले आहे.
नायगाव शहरातील मिरकुटे हॉस्पिटलचे स्थलांतर व उद्घाटन शुभारंभ कार्यक्रमात माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वेळी संजय बेळगे, रवींद्र पाटील चव्हाण, भास्कर पाटील भिलवंडे, संभाजी पाटील भिलवंडे, श्रीनिवास पाटील चव्हाण,देविदास पाटील बोमनाळे , ह.सं.खंडगावकर , अंजनीकर. डॉक्टर बसवंते, रावसाहेब पाटील मोरे, सुरेश पाटील कल्याण, नारायण पाटील जाधव, पांडुरंग चव्हाण ,शरद भालेराव, पांडुरंग चव्हाण, संजय पाटील चव्हाण, पी जी चिखले, वेंकटराव पाटील दुगावकर या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
माजी आमदार चव्हाण यांनी मिरकुटे हॉस्पिटलचे उद्घाटन केल्यानंतर मिरकुटे परिवाराकडून उपस्थित मान्यवरांचा सन्मान केल्यानंतर याप्रसंगी वसंतराव चव्हाण बोलताना पुढे म्हणाले की डॉक्टर राजेश मिरकुटे यांची शैक्षणिक जडणघडण त्यांचे मोठे बंधू मारुती मिरकुटे यांनी केली आहे, कारण त्यांचे वडील दिवगंत माधवराव मिरकुटे गुरुजी यांचे निधन झाल्यानंतर मोठा बंधू म्हणून मारोतराव मिरकुटे यांनी आपल्या भावंडांना परकेपणा वाटू दिलेला नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असे सांगत माधवराव मिरकुटे गुरुजी यांच्याही आठवणीचा उजाळा त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केला आहे.
दिवगंत माधवराव मिरकुटे गुरुजी यांच्या अनेक आठवणीच्या गोष्टी आवर्जून यावेळी त्यांनी व्यक्त केले आहेत, तेव्हा मिरकुटे कुटुंबातील चेहऱ्यावर भावनिकता दिसून आली, यावेळी डॉक्टर शिंपाळे,डॉक्टर विश्वास चव्हाण,डॉक्टर डाकोरे, राजीव पाटील भिलवंडे, प्राध्यापक जीवन चव्हाण,भाऊसाहेब देशमुख,माणिकराव हंगरगे बालाजी नारे,शिवराज वरवटे, किरण कदम, कोकलेगाव नगरीचे सरपंच हनुमंत मिरकुटे, नामदेव गायकवाड, प्राध्यापक बालाजी गायकवाड, संजय बाराळीकर, प्राध्यापक संजय गायकवाड, यासह डॉक्टर राजेश मिरकुटे यांच्या परिवारातील मारुती मिरकुटे, रमेश मिरकुटे, बालाजी मिरकुटे यासह अनेकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी तर आभार डॉक्टर राजेश मिरकुटे यांनी मानले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy