पत्रकारितेतून विश्वास पूर्ण पदाधिकारी निर्माण होणे ही काळाची गरज ; दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा !

[ प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
जिंतूर – पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या स्वतःची विश्वास पूर्ण प्रतिमा निर्माण करून जनसामान्याचे कामे मार्गी लावण्याचे कार्य आपल्या हातामधून घडावित व सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेचा वापर व्हावा असे विचार दर्पण दिनाचे निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना परभणी जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप कोकडवार यांनी व्यक्त केले दरम्यान दर्पण दिनाचे औचित्य साधून सण 2023 साठी जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया ची नूतन कार्यकारीणी ची निवड आज करण्यात आली.
सद्याच्या राजकीय वातावरणात राजकीय पक्ष प्रमाणे पदाधिकारी बदलाचे व फोडाफोडीचे राजकारण पत्रकार संघटनेत पण दिसून येत आहेत म्हणून आपली प्रतिमा आपण स्वतः कशी तयारी करावी या बद्दल आत्मचिंतन होणे गरजेचे आहे व वाचकांनी व नागरिकांनी आपल्या पत्रकारीरतेतील पदाची गरिमा ओळखली असल्याने निष्कलंक पत्रकारिता गरजेची आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अँड सुनील बुघवंत उपस्थित होते. प्रथम दर्पण दिना निमित्त पंडीत बाळशास्त्री जाभेकर यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले याच बैठीत कार्यकारीणी पुढील प्रमाणे ..
जिंतूर ता इलेक्ट्रॉनिक मीडिया ची नूतन कार्यकारीणी महाराष्ट्र पत्रकार संघ संलग्न जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अध्यक्षपदी अजमत खान पठाण यांची निवड तर सचिव फिरोज भाई, कार्याध्यक्ष बि डी रामपूरकर, उपाध्यक्षपदी रहीम शेखभाई, बळीराम भराडे वझर, शेख हनीफभाई बोरी यांची कोषाध्यक्ष, रामकिशन ठोंबरे भोसी ता संघटक, बाबा राज सह सचिव, गणेशराव पालवे हंडी यांची निवड आज करण्यात आली आहे.
सर्वाना जिल्हा अध्यक्ष प्रदिप कोकडवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन दर्पण दिना निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्वांनी प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहिली तर संचलन बी डी रामपूरकर व आभार फिरोज भाई यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या