घरा घरात पोहोचले रिलायन्स फाऊंडेशन !!

(रायगड /म्हसळा प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे )
महाराष्ट्रात मागील महिन्यात जी आपत्तीजनक परिस्थिती ओढवली होती,त्यातीलच एक म्हणजे २२जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आलेला महापूर ज्यामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक संसार उध्वस्त झाले.
नागरिकांचे अक्षरशः हाल हाल होत असताना संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक सामाजिक संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत नव्हे तर कर्तव्य पार पाडत असताना रिलायन्स फाऊंडेशन च्या माध्यमातून आपत्कालीन मदत म्हणून नमकिन,बिस्कीट,बिस्लेरी पाणी,ब्लँकेट या आवशकते च्या तसेच स्यानीटैजेर, मास्क या सुरक्षेच्या दृष्टीने अशा साहित्याचं वाटप करण्यात आले.
सदर साहित्य प्रोजेक्ट मॅनेजर तेजस डोंगरीकर, कार्यक्रम सहाय्यक योगेश मेंदडकर,तसेच ग्रा,पं शिरगांव चे सरपंच श्री.सोमनाथ ओझर्डे (सचिनभाऊ) आणि श्री कालभैरव मित्र मंडळ शिरगांव यांच्या माध्यमातून गरजुं पर्यंत घरोघर जाऊन साहित्याचे वाटप करण्यात आले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या