बिलोली येथे धर्म सभेत विश्व हिंदु परिषद महाराष्ट्र क्षेत्र मंञी शंकर गायकर यांचे हिंदु बांधवाना मार्गदर्शन

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
बिलोली शहरात विश्व हिंदु परिषद, बजरंग दल च्या वतीने धर्म सभेचे अयोजन दि.१४ जानेवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमात मा.श्री.शंकर गायकर यांनी आपल्या मनोगतातून बजरंग दल च्या सर्व हिंदु धर्माच्या बांधवांना विश्व हिंदू परिषद व शौर्य याञा बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.

 विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ने शौर्य याञा काढून शहरातील महत्त्वाच्या मुख्य रस्त्याने पथसंचलन रॕली काढून, जिल्हा परिषद हायस्कूल येथे धर्म सभेत विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते गणवेषात शेकडोच्या संखेत सहभाग घेऊन या धर्म सभेत सज्ज झालेले चित्र दिसुन येत होते. सदरिल विश्व हिंदू परिषद धर्म सभेत अन्याया विरुध्द चिड, साधना, भयमुक्त पणा शांती मिळत असते.


नौदल, वायुदल, सैन्य दल या नंतर बजरंग दलाचीही महत्त्वाची भूमिका असून या देशाकडे जर कोणी वाईट नजरेने बघितले तर त्याची खानदान मिटवणा-याची औलाद आमची आहे. जन्माने हिंदू नसुन त्यांच्या कर्माने हिंदू असेल तरच ख-या अर्थाने हिंदू असून अशा हिंदूत्वाची गरज आज या देशाला आहे. असे महाराष्ट्र क्षेत्र मंञी शंकर गायकर यांनी आपल्या भाषणात उपस्थित मान्यवरां समक्ष बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी राजकीय व सामाजिक, सघटनांसह नागरिक, नवयुवक, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटनिस तथा जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, बिलोली न.प.माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, उमाकांत गोपछडे, भाजपा ता.अध्यक्ष श्रीनिवास पा.नरवाडे, भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष इंद्रजित तुडमे, साईनाथ आरगुलवार, व्यापार संघटनेचे अध्यक्ष अनुदत्त रायकंठवार, साईनाथ शिरोळे सह अनेक मान्यवर उपस्थित झाले.
 विश्व हिंदू परिषद बजरंदल बिलोली चे मुख्य सहसंयोजक गजानन पांचाळ, बिलोली विधीज्ञ अध्यक्ष महेश कुलकर्णी, ऋषिकेश गोगरोड, विठ्ठल तुकडेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
सदर धर्म सभेच्या कार्यक्रमात सुञसंचलन डाॕ.प्रा.गोपाळ चौधरी यांनी केले होते. तर हिंदू विश्व परिषद धर्म सभा, पथसंचलनासाठी बिलोली उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नरुटे यांच्या चौख बंदोबस्तात हा बजरंदलचा कार्यक्रम शांततेच्या वातावरणात संपन्न झाला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या