बिलोली येथे प्रजासत्ताक दिना निमित्य उपविभागिय अधिकारी मा.गिरी यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न.

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे)
बिलोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना निमित्ताने उपविभागीय अधिकारी मा.अमोल गिरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.

सदरिल तहसिल येथे प्रशासकीय कार्यालयाच्या ध्वजारोहनासाठी अधिकारी, शाळेतील विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते, पञकार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनी उपविभागीय अधिकारी मा.अमोल गिरी यांनी ध्वजवंदना देऊन राष्ट्रगीताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

त्यादरम्यान पी.आय.केंद्रे यांनी आपल्या पथकासह सलामी दिले.
तद्नंतर सर्व उपस्थितांनी तंबाखू/धुमृपान व्यसन मुक्तीसाठी प्राथना घेऊन तंबाखू /धुमृपान हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे तरी जनतेनी तंबाखू धुमृपानाचा वापर बंद करावा म्हणून जनजागृती केली.

यावेळी तहसिलदार श्रीकांत निळे, मा.नरावाड, महसुल विभागाचे नायब तहसिलदार आर.जे.चव्हाण, पुरवठा विभाग नायब तहसिलदार उत्तम निलावाड, श्रावण बाळ योजना, सगायो चे नायब तहसिलदार, म.न.रे.गा ए.पी.ओ.सोंडारे, जिल्हा उपरुग्णालय बिलोली वैद्यकीय अधिक्षक मा.नागेश लखमावार, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, नगरसेवक उत्तमराव जेठे, यशवंत गादगे, कार्यकर्ते मुकिंद्र कुडके, संदीक कटारे, शेख पाशा गादीवाले, पञकार रत्नाकर जाधव, मोहसिन खाॕन, गंगाधर कुडके, संजयकुमार पोवाडे, प्रविण सोनकांबळे, यांच्यासह आदी नागरिक, कार्यकर्ते, शाळकरी विद्यार्थी प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदणास उपस्थित होते.

दर वर्षी शहरातील सर्व शाळां तहसिल प्रशासकीय कार्यालयाच्या ध्वजारोहणास ध्वजवंदना देण्यासाठी उपस्थित राहतात. या २०२३ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणास फक्त लिटल फ्लाव्हर काॕनवेंट इंग्लिश स्कुल, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, उर्दु शाळांचे विद्यार्थी व शिक्षकांनी ध्वजवंदना दिली. तर माजी आमदार गंगाधर पटने यांच्या संस्थेची शाळा अंतर भारतीय विद्यालय, कै.पुज्य साने गुरुजी विद्यालय, कै.विजय मेमोरियल स्कूल बिलोली च्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच प्रजासत्ताक दिना निमित्ताने कला प्रदर्शन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या