महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत, महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

७२ व्या प्रजासत्ताक दिनी ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या शुभहस्ते महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

 महापालिकेतील कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर नरेश म्हस्के,आयुक्त डॉ.बिपीन शर्मा यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, सांस्कृतिक क्रीडा समिती सभापती प्रियांका पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती निशा पाटील, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका पुजा करसुळे, यांच्यासह महापालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या