म्हसळा तालुक्यात 73 वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
जिजामाता शिक्षण संस्था संचालित मराठी माध्यमिक शाळा आगवारवाडा येथे 73 वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थापक अध्यक्ष, माजी पंचायत समिती सभापती श्री.महादेव पाटिल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास वरवठणे ग्रामपंचायत सरपंच श्रीमती इशरत फकीह, माजी सरपंच रियाज फकीह, अँड.मुकेश पाटिल, मुख्यध्यापक श्री. संदीप कांबलेकर, श्री संदीप सुतार, श्री. अंगद कांबळे, दिपक म्हात्रे, श्री नितिन म्हस्के, श्री अंकुश गाणेकर, श्री लक्ष्मण गाणेकर, मोहन कांबलेकर, विद्यार्थी यांच्या उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी श्री.मा.डॉ प्रशांत गायकवाड़ साहेब पाभरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मास्क, सँनेटाइज़र व चॉकलेट चे वाटप करण्यात आले.

(आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत गायकवाड़)

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी ची माध्यमिक शाळा पाष्टी येथे 73 वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा. करण्यात आला
स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष, माजी सरपंच श्री राजाराम धुमाळ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच या वेळी मान्यवरांच्या हस्ते संविधान गौरव परीक्षा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री सुदाम माळी, श्री पी.पी पाटिल, विनयकुमार सोनवणे, श्री शिकालगर, श्री ललित पाटिल, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कुल व ज्यू कॉलेज म्हसळा येथे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमेन श्री समीर बनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री प्रभाकर मोरे, श्री प्रा मंहमद शेख, प्रा.श्रीमती देवगावकर, प्रा चक्रधर चव्हाण, श्री प्रा. गावित श्री पडियार, श्री हंगे, श्री चव्हाण, श्री चंद्रकांत गांजरे, श्री उद्धव खोकले, श्री नेताजी गायकवाड़, श्री अत्तार, श्री भायदे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित
होते.
पी. एन. पी.हायस्कूल संदेरी येथे गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण श्री रमेश हाटे, यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक श्री बालाजी पाटोळे , श्रीमती शेख,श्री नारनवर, विद्यार्थी, ग्रामस्त उपस्थित होते.
खरसई ग्रामपंचायतचे सरपंच श्री निलेशजी मांदाडकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत खरसई येथे ध्वजारोहण करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  रा.जि प. शाळा खरसई येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून शिक्षक श्री मड़ावी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. या वेळी मुख्यध्यापक श्री राठोड व शिक्षकवर्ग, विद्यार्थी, नागरिक यांच्या उपस्थित संपन्न झाला.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या