के रामलू पब्लिक स्कूलच्या भव्य व आकर्षक रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
     भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून के रामलू शाळेत 07 : 35 वाजता शाळेच्या संचालिका रमा ठक्कुरवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषेत आपली भूमिका बजावत कुंडलवाडी शहरातून भव्य शोभायात्रा निघाली, यात सर्वप्रथम संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाने रॅलीस सुरुवात झाली.

रॅलीत लेझीम पथक, डंबेल्स पथक, दांडिया, तिरंगा रॅली, विविध धर्माची समानता दाखवणारे विद्यार्थी, टाळ मृदंगाच्या पेटीवर राम कृष्ण हरी म्हणणारे विद्यार्थी विविध संदेश देत शोभा यात्रेत सहभागी झाले होते. मोबाईलचा अती वापर व कोरोना काळातील हे नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे कोरोना काळातील परिस्थितीवर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाने सर्व उपस्थित नागरिकांचे मने जिंकले.

10:05 वाजता नगरपरिषद प्रशासकीय इमारतीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आलेल्या ध्वजारोहणात के. रामलू शाळेतील विद्यार्थ्यांनी संगीतावर राष्ट्रगीत गायन केले. 2021- 22 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कुंडलवाडी केंद्रातून आमच्या शाळेतील कु. सिद्धीका संजय खुळगे प्रथम, अश्विनी शिवाजी मॅकलवार ,विष्णू नागेश आरशेवार द्वितीय तर निकिता दत्तात्रय मॅकलवार या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविल्यामुळे कुंडलवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
तसेच के. रामलू नाबाद व्हॉट्सऍप ग्रुप चे ॲडमिन सयाराम मुक्केरवार यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या कोरोना काळातील परिस्थिती या विषयावरील नाटकात के. रामलू पब्लिक स्कूलने द्वितीय क्रमांक पटकाविला. ह्या यशाचे सर्व श्रेय शाळेतील पर्यवेक्षक कागळे आर डी,अर्चना नरोड, दाक्षायणी नुग्रावर रमेश कासलोड या शिक्षकांना जाते तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या