देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघ विद्यार्थांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून द्या !

रिपब्लिकन सेना बिलोली तालुक्याच्या वतीने मागणी !

[ बिलोली/ गौतम गावंडे ]
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 30 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित केले आहे तरी या दिवशी 90 – देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ संघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे त्यामुळे मतदार संघातील विद्यार्थ्यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या बिलोली तालुक्याच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना मेलद्वारे व उपविभागीय अधिकारी उपविभाग देगलूर यांना मेलद्वारे बिलोली तहसीलदार यांना लेखी स्वरुपात रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
90 बिलोली देगलूर मतदार संघातील आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या अकाली निधनामुळे मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम नुकताच निवडणूक आयोगाने 30 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर केला आहे सदर मतदानाच्या दिवशी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ह्याच दिवशी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा आयोजित केली आहे त्यामुळे मतदार संघातील विचार केला असता जवळ पास १ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत मागील दोन-तीन वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा झाली नाही. शिक्षक पात्रता परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाची आहे व तसेच संविधानाने दिलेला मताचा मूलभूत अधिकार हा सुद्धा महत्त्वाचा आहे लोकशाहीमध्ये एका मताला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे एका मतानुसार कुठल्या पक्षाचा आमदार किंवा अपक्ष आमदार एका मताने निवडून येऊ शकतो ही एका मताची मूल्य आहे संविधानाने दिलेले मताचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही शासनाने या बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी.
हा एकच पर्याय शासनाकडे उरलेला आहे. त्या दिवशी परीक्षा पुढे ढकलता येते ना इलेक्शन पुढे ढकलता येत नाही ही समस्या लक्षात घेऊन शासनाने टपाली मतपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे. असे निवेदन बिलोलीचे तहसीलदार यांना रिपब्लिकन सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष गौतम गावंडे रिपब्लिकन सेनेचे बिलोली तालुका महासचिव कपिल भेदेकर यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केले आहेत. 
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या