जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारीला लागा ; रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे

रिपब्लिकन युवासेनेचा बीड जिल्हा दौरा यशस्वी 
जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष, सरपंच किरण घोंगडे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य युवा संघटक मुजिबभाई पठाण, मराठवाडा निरिक्षक अनिल शिरसे, पप्पू सोनकांबळे, बबलू वाघमारे उपस्थित होते.
बैठकीत बीड येथील रवि वाघमारे यांची मराठवाडा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. बीड पुर्व युवा जिल्हाध्यक्ष अजय गोरे यांची निवड करण्यात आली. बीड पश्चिम जिल्हाध्यक्ष धम्मदिप वडमारे यांची निवड करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या