अर्णब गोस्वामीवर आरोप करणारे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील त्या पत्राची सत्यता तपासावी – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले!

मुंबई दि.12 –

रिपब्लिक टी व्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आरोप करणारे अन्वय नाईक यांचे आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारे पत्र आता पोलिसांनी उघड केले आहे.

हे प्रकरण 2018 सालीच बंद झाले होते.तेंव्हा हे पत्र पोलिस यंत्रणेकडे नव्हते का ? आताच कसे हे पत्र पुढे आले? त्यामुळे या पत्राची सत्यता तपासली पाहिजे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

दिवंगत अन्वय नाईक यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणी अर्णब गोस्वामी दोषी असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी मात्र त्यांचा छळ कोणी करू नये. ते पत्रकार आहेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये असे ना रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जमीन मंजूर करून न्याय दिला आहे. न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास दृढ करणारा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धिप्रमुख

ताज्या बातम्या