आरक्षण वर्गीकरणासह सर्व लाभार्थ्यांनी आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करावे, प्रा.डॉ.शंकर गड्डमवार !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
   भारतातील वंचित घटकांना विकसित करण्याबरोबर आरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेतील कलम 16.4 मध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे पण अलीकडच्या काळामध्ये अप्रत्यक्षरीत्या आरक्षण संपुष्टात आणण्या साठी सरकारी उद्योगाचे खाजगीकरण आणि भांडवलदारांना खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देऊन आरक्षणाच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून आरक्षण वर्गीकरणाची मागणी करणाऱ्यासह आरक्षणाच्या एससी एसटी ओबीसी सर्व लाभार्थ्यांनी आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे नाहीतर आरक्षणाची तरतूद केवळ संविधानामध्येच राहील असा गर्भित इशारा सेवानिवृत्त प्रा.डॉ.शंकर गड्डमवार यांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केले. यावेळी विचारपीठावर अनुसूचित जाती वर्गीकरणाचे मराठवाडा प्रमुख परमेश्वर बंडेवार व मल्हारराव तोटरे यांची उपस्थिती होती.
प्रस्ताविकामध्ये अनुसूचित जाती वर्गीकरण संबंधी मल्हारराव तोटरे यांनी मार्गदर्शन केले तर चळवळीची दिशा या अनुषंगाने परमेश्वर बंडेवार यांनी आपले विचार मांडले अनुसूचित जाती वर्गीकरणासाठी अनुसूचित जातीतील सर्व समाज बांधव एक संघ करण्यासाठी व चळवळ गतिमान करण्यासाठी कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.यावेळी बिलोली तालुका सहप्रमुख म्हणून हनुमंत भाऊराव गायकवाड, संजय बंडू गायकवाड,चिमणापुरे चंद्रशेखर धोंडीबा यांनी जबाबदारी देण्यात आली नायगाव तालुक्यामध्ये राजेंद्र मारुती रेड्डी, ज्ञानेश्वर सोनेवार, ्व्यंकटी नरसीकर, बालाजी निवृत्ती घंटेवाड, संभाजी परसराम कांबळे, आनंदराव सूर्यतळ, साहेबराव सुर्यकार यांची सहप्रमुख म्हणून निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले याप्रसंगी पत्रकार माधव बैलकवाड आणि लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर कोतेवार यांनी समाजातील असहकार्य प्रवृत्ती व बेजबाबदारपणावर भाष्य करून आज जबाबदारीने कार्य करण्याची किती गरज आहे हे उदाहरणा दाखल निदर्शनास आणून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गंगाधर कोतेवार यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या