संविधान वाचलं तर आरक्षण वाचेल – बाळासाहेब आंबेडकर

( बिलोली प्र – सुनिल जेठे )
नर्सी येथे आरक्षण बचाव ओ.बी.सी. महामेळावाचे आयोजन दि.7 जानेवारी रोजी करण्यात आले. या महामेळाव्यात आपण ओ.बी.सी. आरक्षण वाचवले अस म्हणतोय ; संविधान वाचलं तर आरक्षण वाचेल असे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.

आरक्षण बचाव सभेत भारतीय जनता पार्टी चा अजेंडा काय आहे या बद्दल सविस्तर अशी सखोल माहिती बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित ओ.बी.सी नागरिकांना दिली. बाळासाहेब आंबेडकर यांनां ऐकायला ओ.बी.सी सह दलित बांधव, भगिनी चा जन सागर नर्सीत पहायला मिळाला.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या