स्त्रियांचा आदर करणारा राजा म्हणुन छ.शिवरायांची देशभर ओळख – शारदा माळे

[ प्रतिनिधी – दीपक गजभारे ]
आजच्या युगात दररोज महिलावर अत्याचार होताना दिसतात पण छत्रपती शिवरायांच्या राज्यात महीलांचा आदर केला जायचा म्हणुन आजच्या पिढीने छत्रपती शिवरायांचा आदर्श घेण्याची गरज आहे. असे प्रतिपादन बिलोली तालुका समतादुत श्रीमती शारदा माळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
दि.19 फेब्रूवारी रोजी छ. शिवाजी महाराज यांची जयंती कस्तुरबा गांधी विद्यालय बिलोली येथे बार्टीच्या वतीने साजरी करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यशस्थानी सौ.सावळे जी.आर.होत्या. तर प्रमुख उपस्थिती सौ.कोतवाड ए.एस, सौ.लांब एस.आर, सौ.हाणमंते एस टी, सौ.गायकवाड जे.एन, श्री.दुधमल के. एस, श्री.पांडागळे एस.एस, श्री.शेख एम आर होते.
सदर कार्यक्रम जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या