तलाठी येताच,तराफे टोपले फावडे आदी साहित्य सोडून बिहारीबाबूंनी ठोकली धूम !

विशेष प्रतिनिधी / रियाज पठान

शहरासह नांदेड जिल्ह्यात खुलेआम अवैद्य रेती उपसा होत असतानाही उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार दुर्लक्ष करीत असून तरीही काही तलाठी व ग्रामसेवक मात्र जिवाची पर्वा न करता अवैद्य रेती उपसा करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करीत आहेत.अशीच घटना लोहा तालुक्यातील बेटसांगवी येथील रेती घाटावर घडली.तलाठी येताच बिहारी बाबूंनी धूम ठोकली यावेळी तराफे टोपले फावडे यासह अनेक वस्तू जागेवर सोडून बाजूस पळून गेले. एकीकडे जिल्हा प्रशासन रेतीघाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करीत असले तरी नांदेड शहरासह जिल्ह्यातील रेती घाटावर रेतीचा अवैद्य उपसा सुरूच आहे. रेती घाटाचा लिलाव होत असल्याने रेती माफियांनी दुप्पट वेगाने रेती उपसा सुरू केला आहे बिहारी बाबूंना रेती उपसासाठी तैनात केले. असून गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू आहे. या अवैध रेती उपस्याकडे उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार दूर्लक्ष करीत आहेत. अधिकार्‍यांवर राजकीय दबाव असून आवाज न करण्यासाठी लक्ष्मी प्रसन्न करण्यात आली आहे एकीकडे राजकीय दबाव दुसरीकडे येणारी “लक्ष्मी” यामुळे हे अधिकारी विरोध न करता नोकरीपेक्षा “खुर्ची” वाचण्यात मग्न आहेत
लोहा तालुक्यातील बेट सांगवी येथे अवैद्य रेतीचा उपसा होत असल्याची माहिती समजल्यानंतर तलाठी यांनी धाव घेतली यावेळी गोदापात्रात बिहारी बाबू तर त्याच्या साह्याने रेती उपसा करीत असल्याचे दिसून आले तलाठी आल्याची दिसताच बिहारी बाबू ने धूम ठोकली. यावेळी घटनास्थळी रेतीचा साठा आढळून आला तराफे, फावडे,टोपले आदी साहित्य जागेवर पडून होते. दोन दिवसापूर्वी असाच प्रकार भारसवाडा येथेही घडून आला. इथेही बिहारी बाबू सर्व साहित्य सोडून पळून गेले.याकडे प्रशासन बघ्याची भूमिका घेऊन मूग गिळून गप्प आहे.काही दिवसापूर्वी बेटसांगवी येथे महसूलच्या पथकाने धाड टाकून 50 ब्रास रेती जप्त करीत जागेवर लिलाव केला होता यावेळी दोन हायवा टिप्पर दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता तरीही अवैद्य उपसा सुरूच आहे.

सोनखेड पोलिसांचे हात वर

बेट सांगवी येथे बिहारी बाबांकडून अवैद्य रेतीचा उपसा होत असल्याची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी तलाठ्याने धाव घेतली त्यानंतर सोनखेड पोलिसांना नागरिकांनी माहिती कळवली बेट सांगवी घाटावर कार्यवाही झाल्याचे समजताच सोनखेड पोलिसांनी ‘ “हात वर” केले कार्यवाही तर सोडाच घाटावर जाण्यापूर्वी पोलीस प्रशासनाला कळविण्याची गरज असल्याचा सल्लाही पोलिसांनी नागरिकांना दिला सोनखेड पोलिसांचा हा सल्ला फुकट जात नव्हता हे सत्य लपवता येणार नाही.

ताज्या बातम्या