नायगाव ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तीन सेवानिवृत्त ग्रामसेवकांचा सपत्नीक सत्कार करून निरोप !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
पंचायत समिती नायगाव येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ ग्रामसेवक श्री. यु. आर. भागानगरे . श्री. एम. एन. बंडे व ग्रामविकास अधिकारी श्री. पी. पी. नेरलेवाड हे वयोमानानुसार सेवानिवृत झालेले आहेत त्यामुळे त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सोमवारी दि.3/4/2023 रोजी सकाळी 10 : 30 वाजता कै. बळवंतराव चव्हाण सभागृह पंचायत समिती नायगाव येथे पार पडला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेल्या तीनही ग्रामसेवकांचा सपत्नीक आहेर व विठ्ठल-रुक्मिणीऊची मुर्ती देऊन सेवापुर्ती सोहळा पार पडला.
या कार्यक्रमांच्या सुरूवातीला नुकतेच निधन झालेले ग्रामसेवक बी. एन. पचलिंग यांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय पा. वडजे , प्रमुख पाहुने गटविकास अधिकारी श्री. एल .आर .वाजे. , विस्तार अधिकारी गिरीश कानोडे , बांधकाम विभागाचे अभियंता गोणेवार , टोम्पे ,बासरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ग्रामसेवक यु डी भागानगरे , मोहनराव पाटील बंडे , ग्रामविकास अधिकारी पी पी नेरलेवाड हे नांदेड जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यात ३४ ते३६ वर्ष ग्रामसेवक म्हणून जनतेची सेवा केले ते तीन ही ग्रामसेवक नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि.एन. ई १३६ तालुका नायगाव चे अध्यक्ष टि.जी.पाटील रातोळीकर यांच्या नेतृवाखाली हा भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात तिन्ही निरोपमुर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर नारायण पाटील शिंदे, राजेश दमकोंडवार, शाखा अभियंता गोणेवार, सचिव सुर्यकांत बोंडले आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. टी. जी. पाटील रातोळीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. नागेश यरसनवार यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. हानमंत पाटील शिंदे यांनी मानले. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे सचिव सुर्यकांत बोडले ,उपाध्यक्ष रविराज नव्हारे, नागेश यरसनवार, हानमंत शिंदे , साईनाथ पा.चव्हाण, केशव पा.पवळे , अशोक कदम, यादव सुर्यवंशी , रमेश जेठेवाड , दत्ता रेडेवाड , बी टी सुरेवाड , नामदेव माने , व्यंकटेश पाटील, विनायक कोंडावार, संदीप पुरजवार जाधव, दिलीप खैरनार,बरबडेकर , संदीप मोरे अविनाश हाळदेवाड, राजू मद्देवाड, मिलींद जोंधळे , गणेश सुभानजोड, शिदे , निलेश कुलकर्णी, शारदा भांजे , सुजाता शिंदे , मुगटकर , लाडके , गुट्टे , मोरे , गिरी , बेलुरे , पारसेवार . तसेच हिप्परगा जा.येथील जी.प.चे मुख्याध्यापक माधव वटपलवाड. सेवानिवृत्त शिक्षक रुद्रवाड.व ग्रामसेवकासह पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या