धर्माबाद येथील लोहबंदे गंगाधर सेवानिवृत्त !
(धर्माबाद ता.प्र. नारायण सोनटक्के)
औद्योगिक नारायण सोनटक्के प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे चतूर्थ श्रेणी पदावर कार्यरत असलेले गंगाधर धोंडीबा लोहबंदे हे तब्बल ३६ वर्षे विद्यार्थ्यांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी प्रेमाने वागत सेवा केली.
मनमिळावू स्वभाव प्रामाणिकपणा हसमुख व प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे गंगाधर लोहबंदे हे वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे नियत वयोमानानुसार चतुर्थ श्रेणी या पदावरून उध्या ३१ जानेवारी २०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.हुशार अभ्यासू आणि माणुसकीची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात ओळख आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबादच्या वतीने आज दि:३० जानेवारी रोजी ११:३० वाजता ITI सभागृहात भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी प्राचार्य एस.एस.परघणे,गट निदेशक श्रीमती नवसागरे जी.एस,से.नि.निदेशक मारकवाड आर.टि,शिल्प निदेशक ए.जी.कुलकर्णी, लेखापाल एस.एम.परळे,गिरी सर,आरेवार सर,एम.डि.जोंधळे, मा.तालुका अध्यक्ष भा.बौ.महासभा धडेकर गंगाधर, सामाजिक कार्यकर्ते जे.के.जोंधळे,मा.सभापती गंगाधर जारिकोटकर, गंगाधर वाघमारे ,दिगाबंर वाघमारे आदिलाबाद, यांनी पुढील भावी आयु आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.